बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

मातृदिन : वेदांमध्ये आईचा महिमा

- डॉ. छाया मंगल मिश्र
 
वेदांमध्ये आईला 'अंबा', 'अम्बिका', 'दुर्गा', 'देवी', 'सरस्वती', 'शक्ती', 'ज्योति', 'पृथ्वी' वगैरे नावे संबोधित केले जाते.
 
या व्यतिरिक्त 'आई' ला को 'माँ' 'माता', 'मात', 'मातृ', 'अम्मा', 'अम्मी', 'जननी', 'जन्मदात्री', 'जीवनदायिनी', 'जनयत्री', 'धात्री', 'प्रसू' अनेक नावे आहेत. 
 
रामायणमध्ये श्रीराम आपल्या श्रीमुखाने 'आई' ला स्वर्गापसून अधिक महत्त्व देतात. ते म्हणतात-
'जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरीयसी।'
अर्थात, जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा महान आहे.
 
महाभारतात जेव्हा यक्ष धर्मराज युधिष्ठराला प्रश्न विचारतात की 'भूमीपेक्षा भारी कोण?' तेव्हा युधिष्ठर उत्तर देतात-
'माता गुरुतरा भूमेरू।'
अर्थात, माता या भूतीपेक्षा अधिक महान आहे.
 
सोबतच महाभारत महाकाव्य रचियता महर्षि वेदव्यास यांनी 'आई' बद्दल लिहिले आहे-
'नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।'
अर्थात, आई समान कुठलीही सावली नाही, आईसमान कोणाचाही आधार नाही. आईसमान रक्षक नाही आणि आईसमान कोणतीही प्रिय वस्तू नाही.
 
तैतरीय उपनिषदमध्ये 'आई' बद्दल या प्रकारे उल्लेख आहे-
'मातृ देवो भवः।'
अर्थात, आई देवांपेक्षा श्रेष्ठ आहे.
 
'शतपथ ब्राह्मण' यांची सूक्ती या प्रकारे आहे-
'अथ शिक्षा प्रवक्ष्यामः
मातृमान् पितृमानाचार्यवान पुरूषो वेदः।'
अर्थात, जेव्हा तीन उत्तम शिक्षक अर्थात एक आई, दुसरे वडील आणि तिसरे आचार्य असल्यास मनुष्य ज्ञानवान होतो.
 
'आई' च्या गुणांचे उल्लेख करत म्हटले गेले आहे की- 
'प्रशस्ता धार्मिकी विदुषी माता विद्यते यस्य स मातृमान।'
अर्थात, ती आई धन्य आहे जी गर्भधारणेपासून, विद्या पूर्ण होयपर्यंत, चांगुलपणाचा उपदेश करते.
 
हितोपदेश-
आपदामापन्तीनां हितोऽप्यायाति हेतुताम् ।
मातृजङ्घा हि वत्सस्य स्तम्भीभवति बन्धने ॥
जेव्हा विपत्ती येते तेव्हा हितकारी देखील एक कारण बनतात. वासराला बांधण्यासाठी आईची मांडीच खांब्याचं काम करते.
 
स्कन्द पुराण-
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।'
 
महर्षि वेदव्यास
आईसमान सावली नाही, आश्रय नाही, सुरक्षा नाही. आई समान या जगात कोणीही जीवनदाता नाही.