सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Updated: रविवार, 10 मे 2020 (10:48 IST)

Mother's Day Quotes आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
 - कवी यशवंत
 
न ऋण जन्मदेचे फिटे
- मोरोपंत
 
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
- माधव ज्युलियन
 
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
- ग. दि. माडगूळकर
 
आई
ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरांपेक्षा
नऊ महिने जास्त ओळखते
 
मरणयातना सहन करुन
जी आपली जीवनयात्रा सुरु करुन देते
ती आई
 
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे- आई