सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

History of Mothers Day : मातृदिन साजरा करण्याची परंपरा केव्हा, का आणि कशी सुरू झाली

जग भरात मदर्स डे मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस. पण काही देशांमध्ये वेग वेगळ्या तारखेत देखील साजरा करण्यात येतो हा दिवस. जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात.
 
मदर्स डेबद्दल बरीच वेग वेगळी मान्यता आहे. काहींचे मानणे आहे की मदर्स डे च्या या खास दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली होती. वर्जिनियामध्ये एना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरुवात केली होती. असे म्हटले जाते की एना आपल्या आईशी फार प्रेम करत होती आणि तिच्याकडून बरीच काही तिने शिकले होते. तिने कधीही लग्न केले नाही आणि आईच्या निधनानंतर तिने तिच्याप्रती आदरम्हणून ह्या खास दिनाची सुरुवात केली. ईसाई समुदायाचे लोक या दिवसाला वर्जिन मेरीचा दिवस मानतात. युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग संडे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
 
याच्याशी निगडित एक कथा अशी देखील आहे की मदर्स डेची सुरुवात ग्रीसहून झाली होती. ग्रीसचे लोक आपल्या आईचा फार सन्मान करतात. म्हणून ह्या दिवशी ते तिची पूजा करतात. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मदर्स डे च्या दिवशी ते तिची पूजा करत होते.
 
9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्‍याच देशांमध्ये हा खास दिवस मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला. तर मग या वर्षी मदर्स डे चा हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया. ते सर्व काही करा जे तुम्ही व्यस्त असल्यामुळे करू शकत नाही. आईला तिच्या आवडीचे नक्की काही घेऊन द्या.
 
गूगल काय म्हणते ...
आपण गूगल वरून माहिती शोधल्यास, मदर्स डेचे दोन प्राथमिक निकाल उद्भवतात, म्हणजे लेंटमध्ये मदरिंग संडे, ब्रिटिश कॅलेंडरचा चौथा रविवार आणि मे चा दुसरा रविवार या रुपात.
 
मदर्स डे चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या दिवशी भेट म्हणून गुलनारचे फुले सर्वाधिक विक्री केली जातात. 1997 मध्ये, चीनमध्ये हा दिवस गरीब मातांना मदत करण्यासाठी निश्चित करण्यात आला. विशेषत: त्या भगिनींसाठी ज्या पश्चिम चीनसारख्या ग्रामीण भागात राहत होत्या.
 
जपानमध्ये मातृदिन शोवा कालावधीत महाराणी कोजून (सम्राट अकिहितोची आई) यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जात होता. आता आपल्या आईसाठी हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी मुलं आईला गुलनार आणि गुलाबाचे फुलं देतात.
 
थायलंडमध्ये थायलंडच्या राणीच्या वाढदिवशी मातृत्व दिवस साजरा केला जातो. भारतात कस्तुरबा गांधी यांच्या सन्मानार्थ साजरे करण्याची परंपरा आहे. नंतर या तारखांना अशा प्रकारे बदलण्यात आले की विविध देशांमध्ये प्रचलित असलेल्या विविध धर्मांच्या देवीचा वाढदिवस किंवा पुण्यदिन म्हणून साजरे होऊ लागले. जसे कॅथोलिक देशांमध्ये व्हर्जिन मेरी डे आणि इस्लामी देशांमध्ये पैगंबर मोहम्मद यांची मुलगी फातिमा यांच्या वाढदिवसाच्या तारखांना यात बदल करण्यात आले.
 
तसे, काही देश 8 मार्चचा महिला दिन मातृदिन म्हणून साजरा करतात. तर काही देशांमध्ये मातृदिनानिमित्त जर आपल्या आईचा योग्य सन्मान केला गेला नाही तर तो गुन्हा असल्याचे समजतात.