सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली

खरंय देवा, झोळी कित्ती ही असो भरली,
आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली,
ती असतांना जग तिच्या भोवती फिरे,
असण्याची सवय तिची, जग आपलेच सारे,
घरातील जीवन्त पणा वाटे तिच्यामुळे होता,
आपण बाहेर असलो तरी, जीव तिच्या भावोती होता,
न सांगता ही कसें कळे बरं तिला सर्वच,
तिच्यातला अंश आपण ह्यांतच आलं सर्वच,
असो कुठं ही असं तू या ब्रम्हांडात ग माते,
सदा सुखी तू राहा, असंच देवाकडे मी मागते!
....अश्विनी थत्ते