गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (17:40 IST)

Pithori Amavasya Vrat 2020 : वंशवृद्धी आणि मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी अमावस्या

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.
 
व्रताचे विधान या प्रकारे आहे-
श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. 
सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. 
त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. 
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. 
त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. 
नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. 
मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
 
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. 
 
या ‍दिवशी बेदाणे घातलेली भाताच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पूजा केल्यावर आरती व कहाणी करावी.