1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (07:33 IST)

सिनेट निवडणुकीसंदर्भात चौकशी अहवाल आला समोर; आशिष शेलारांना धक्का

ashish shelar
मुंबई  विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीतील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. या आरोपानंतर मुंबई विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन करत अहवाल प्रसिद्ध केला आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या तक्ररीत काही तथ्य नसल्याचा निकाल चौकशी समितीने दिला आहे. त्यामुळे आशिष शेलार यांना मोठा धक्का बसला आहे.
 
सिनेट निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याची तक्रार आशिष शेलार यांनी केल्यानंतर समितीने मुंबई विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन करत अहवाल प्रसिद्ध केला आहे. मतदार यादीसंदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे समितीने नोंदवली. चौकशी समितीने म्हटले की, मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या मतदारांची अंतिम संख्या 90 हजार 224 एवढी झाली आहे. या अंतिम मतदारांच्या यादीत 756 एवढ्या मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा दिसून येत आहेत. पण त्यातील प्रत्येक मतदार हा वेगळा आहे. मतदाराच्या पदवी प्रमाणपत्रावरील नाव, पदवीचा विषय, विद्याशाखा, निवासाचा पत्ता आणि पदवी प्राप्त होण्याचे वर्ष, अर्जावर नमूद केलेली माहिती यावरून खात्री केली असल्याचं समितीकडून सांगण्यात आले आहे.