शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (09:45 IST)

उत्खननादरम्यान पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या

किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या महत्वपूर्ण वास्तूंच्या उत्खननादरम्यान पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या आहेत. जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस  सुरू असलेल्या एका मोठ्या वाड्यांमधून एक सोन्याची बांगडी आणि अन्य वस्तू सापडल्या आहेत. याबाबतची माहिती प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  पत्रकार परिषदेमध्ये दिली. 
 
यावेळी संभाजीराजे यांनी  सांगितले की, मागील तीन वर्षांपासून रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड आणि आसपासच्या परिसरातील उत्खनन तसेच ऐतिहासिक दर्जा सांभाळून विकासकामे सुरू आहेत. या संदर्भात गडावरील विविध वास्तूंच्या उत्खननाची कामे रायगड प्राधिकरणाने केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत सुरू केली आहेत. यामध्ये आजपर्यंत गेल्या तीन वर्षांत अनेक सोन्या चांदीचे दागिने, वस्तू भांडयांचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
 
एका वाड्यातून एक सोन्याची बांगडी तसेच काही अन्य दागिन्यांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. या बांगड्या वरील असलेले नक्षीकाम लक्षात घेता त्या काळातील विविधता व सुबकतेने केलेली कामे दिसून येतात. असे मत संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेवेळी व्यक्त केले.