शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (08:50 IST)

मग मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला ? : अतुल भातखळकर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. दरम्यान घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला अशी विचारणा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
 
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा”.
 
आदित्य ठाकरे यांच्यासहित त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात असताना खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.