राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला.  यावरून भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांना प्रतिटोला लगावला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकद्वारे पोस्ट केली आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट अशी  :-
	"फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला...
				  				  
	पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...
	हंगेरीत वर्क फ्रॉम होम...
	पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...
	पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...
	ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...
				  																								
											
									  
	पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत
	एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !
				  																	
									  
	बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...
	पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...
	पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...
				  																	
									  
	पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...
	आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...
				  																	
									  
	पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...
	फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...
	पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...
				  																	
									  
	युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय...
	तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
				  																	
									  
	विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
				  																	
									  
	होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत...
	आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची..."