IndiGoच्या बंगळुरू-जयपूर उड्डाणात मुलीचा जन्म
बुधवारी बेंगळुरूहून जयपूरला येणार्या इंडिगो विमानात एका बालिकेचा जन्म झाला. क्रूने विमानात प्रवास करणार्याज डॉक्टरांच्या मदतीने ही प्रसुती केली.
खरं तर विमानात प्रवास करणार्यार एका महिलेला अचानक वेदना होऊ लागल्या. यावर क्रूने विमानात प्रवास करणार्यार डॉक्टरची मदत घेतली आणि डॉक्टरांच्या सूचनेनुसार प्रसूती केली.
जयपूर विमानतळाशी संपर्क साधून त्यांना तातडीने डॉक्टर व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास सांगितले. आई आणि मुलगी दोघांची प्रकृती स्थिर आहे.