शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (16:38 IST)

नायर हॉस्पिटलमध्ये २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये एका २६ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली आहे. नायर हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ विभागातील डॉक्टरने सोमवारी रात्री आत्महत्या केली असून या मृत डॉक्टरचे नाव डॉ. संदेश तुपे आहे. डॉक्टरांचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला आणि त्याला पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे.
 
नायर हॉस्पिटलचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, या डॉक्टरांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही आणि पुढील तपासणीसाठी मृतदेह अग्रिपाडा पोलिस ठाण्यात सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.