बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:44 IST)

18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन अजून आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडली. यावेळी शेतकरी आंदोलकांनी 18 फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय  घेतला आहे. दुपारी 12 ते 4 असे चारतास हे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी 12 फेब्रुवारीपासून राजस्थानच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करू न देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मोर्चा आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल. दरम्यान, कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. त्यांनी काही नेमकी गोष्ट सांगितली तर बदल करण्यात कोणताही संकोच नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले आहे.