गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (22:22 IST)

अन् पंकजा मुंडे बीडमध्ये अचानक पोहोचल्या पान स्टाॅलवर..!

And Pankaja Munde suddenly reached the page stall in Beed ..!
राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या नेत्यालाच ‘लोकनेता’ उपाधी मिळते. अगदी त्याचाच प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबाबतीत पुन्हा एकदा अनुभवास आला. त्याचं झाले असे की, पंकजा मुंडे औरंगाबादहून परळीकडे जात होत्या.
 
या दरम्यान बीडमध्ये आल्यानंतर पंकजा मुंडे बशीरगंज भागात आल्याचे समजताच या भागातील शेख जमील यांनी त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, पंकजा मुंडेंनी देखील होकार दित तीथे पोहोचल्या आणि लोकांमध्ये मिसळल्याही..! पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले.