बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (17:40 IST)

धक्कादायक ! ठाण्यातील वृद्धाश्रमात कोरोनाचा स्फोट, 67 जणांना कोरोनाची लागण

ठाण्याच्या खडवली वृद्धाश्रमातील 67जणांना कोरोनाची लागण लागल्याचे वृत्त समोर आले आहे. सर्व रुग्णांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त समजले आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे लसीकरण झाले आहेत.  वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आला होता नंतर कर्मचाऱ्याला देखील ताप आला नंतर अशा प्रकारे कोरोनाची लागण 67 जणांना लागल्याचे समजले. एकाच वेळी एवढ्या जणांना कोरोनाची लागण लागल्याचे  समजल्याने खळबळ उडाली आहे. वृद्धाश्रमातील सर्व 67 कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनांकडून मिळाली आहे.  एकाच वेळी 67 जणांना उपचारासाठी  दाखल केले जाणार असल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. त्या सर्वांना आणण्यापूर्वीच तातडीने वॉर्ड , डॉक्टर-नर्स व इतर कर्मचारी वर्ग सज्ज असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.