शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (15:13 IST)

आणि निमोनिया भाजपाला झाला, राष्ट्रवादीचा टोला

२०१९ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही, अशी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपाला झाला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे. शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी टीका केल्यानंतर मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे.
 
“साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार शरद पवारांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे,” अशी मिश्किल टीकाही महेश तपासे यांनी केली.
 
वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी जशास तसे उत्तर देताना राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे आव्हान दिले होते.