रविवार, 3 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (13:07 IST)

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

सिंधुदुर्गच्या प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. भराडी देवीच्या या यात्रेत हजारो भाविक हाजिरी लावतात. देवीच्या दर्शनासाठी लांब लांबहून भाविक येतात.
 
भराडी देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येत असल्याचे सांगितले जात आहे.
 
यात्रेसाठी सुमारे पाच लाख भाविक दाखल झाल्याचे समजते. तर मंदिर दर्शनासाठी पहाटे 3 वाजेपासून उघडले गेले आहे.