1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (23:47 IST)

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट या तारखे पासून मिळणार

maharashatra board
दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च पासून सुरु होणार असून दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता परीक्षेची धावपळ सुरु असून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजे पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट प्रिंट करून घ्यायचे आहेत. 
त्यात काहीही त्रुटी आढळ्यास किंवा काही सुधारणा असल्यास विद्यार्थ्यांना करून घ्यायच्या आहे. जेणे करून विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होणार नाही. 
 
Edited By - Priya Dixit