Dharma Sangrah
✕

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

Updated: मंगळवार, 11 मे 2021 (08:23 IST)
 
राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या चांदिवाल समितीला दिवाणी न्यायालयीन अधिकार देण्यात आले आहेत. विरोधकांनी या समितीला कोणतेही अधिकार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी करून चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर प्रतिमहा 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र 20 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलं होतं. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे अनिल देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
 
दरम्यान, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते. या समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते? नियम काय सांगतात ते जाणून घ्या

सोन्याच्या दरात १८,५३० ची मोठी घसरण! पुढे काय होणार? पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे

महाराष्ट्रातील दुष्काळामुळे मुलींच्या लग्नात अडथळा आल्यास शिवसेना जबाबदारी घेईल, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रात पाणीटंचाई; मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ ३४% पाणी, मुख्यमंत्र्यांकडून कडक सूचना

पुढील लेख
Show comments