शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (21:17 IST)

अनिल देशमुख यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली

Anil Deshmukh's stay in ED cell extended
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा ईडी कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढला आहे. त्यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. पीएमएलए सेशन कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.
 
अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. 6 तारखेला त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.
 
यावेळी त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. देशमुख ईडीला सहकार्य करत असल्याने त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. तर ईडीच्या वकिलांनी देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्यांना कोठडी देण्याची मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख यांना तीन दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.