1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:30 IST)

दापोलीत 144 कलम लागू

anil parab
परिवहन मंत्री अनिल परब  मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की हा रिसॉर्ट माझा नसून किरीट सोमैयाचा आहे आणि हे नौटंकी करत आहेत. याबाबत मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाणार आहे, असे परब यांनी म्हटलं आहे.  दापोली येथील रिसोर्ट अनधिकृत असून, तो तोडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया आज प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत पोहोचले आहेत. यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमैयांना प्रत्युत्तर दिले आहे. ते होते.

 किरीट साेमय्या जिल्ह्यात दाखल होताच पाेलिसांनी १४४ कलम लागू करत मनाई आदेश जाहीर केला आहे. या आदेशानंतर दापाेली पाेलीस स्थानकात काेणाला साेडायचे यावरुन जाेरदार राडा झाला. निलेश राणे यांनी आक्रमक हाेत पाेलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे मुरुड येथील रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला आहे. याबाबत त्यांनी केंद्रापर्यंत तक्रार अर्ज दाखल करुन बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही हे बांधकाम पाडण्यात आलेले नाही.
  
हा रिसॉर्ट माझा नाही आहे - अनिल परब म्हणाले की, या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल आहे. पण, मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार आहे. माझी प्रतिमा खराब करायची व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम किरीट सोमैया करत आहेत. हा रिसॉर्ट माझा नाही आहे, हे मी अगोदरही सांगितलेले आहे. याबाबत ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशा, कागदपत्रे तपासायचे होते ते सर्व झालेल आहे. यात माझा काही संबंध नाही. किरीट सोमैया वारंवार जाणून-बुजून हा रिसॉर्ट माझा आहे, असे सांगत आहेत. मात्र, किरीट सोमैया हा रिसॉर्ट पाडायला पालिकेचे नोकर आहेत का?, असा प्रश्नही परब यांनी उपस्थित केला आहे.