1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (21:48 IST)

एसटी संपाचा आणखीन एक बळी, बस चालकांची आत्महत्या

Another victim of ST strike
जळगाव जिल्ह्यातील यावल आगारात चालक म्हणून सेवारत असलेल्या कर्मचाऱ्याने, रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. शिवाजी पंडित पाटील असं आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. एसटीच्या संपामुळं शिवाजी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. 
 
शिवाजी पाटील तीन दिवसांपूर्वी जळगावात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे आले होते. मागील अनेक महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे, आपल्याला पगार मिळत नाही, म्हणून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं होतं. अशातच सोमवारी त्यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.