शाळांच्या उन्हाळी सुट्या रद्द
कोरोनामुळे शाळकरी मुलांना नुकसान भरपाई देण्याचा मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा दोन वर्षांपासून बंद आहेत.
आता शाळा सुरू झाल्या आहेत आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू पाहत होते म्हणून आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.