शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (15:28 IST)

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री होण्याचा दुसऱ्यांदा बहुमान त्यांना मिळाला आहे. सावंत यांना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांनी कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.