शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (15:15 IST)

महाराष्ट्रावर वीज संकट, वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या: उर्जामंत्री राऊत

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यांमध्ये वीज संकट उद्भवल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. 
 
28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर गेले असून या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. 
 
राज्यातीळ 7 औष्णिक विद्युत केंद्र पैकी 5 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक असल्यामुळे राज्य सरकारने आधीच नियोजन न केल्याने हे संकट उद्भवल्याचे दिसून येत आहे.
 
दरम्यान राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मान्य केले की वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाल्यामुळे विजेचे संकट आले आहे. 
 
वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी माझी त्यांच्या सोबत चर्चा सुरू असून एक पाऊल त्यांनी मागे घ्यावा आणि एक पाऊल मी पुढे येतो अशी देखील विनंती राऊत यांनी केली.
 
राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.