शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (14:34 IST)

अहमदनगरच्या केमिकल कंपनीत भीषण आग

अहमदनगरच्या श्रीरामपूर मध्ये एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या केमिकल कंपनीला दुपारच्या वेळी आग लागली. आग वेगाने पसरली असून या आगीत संपूर्ण कंपनी भक्षस्थानी झाली आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीच्या धुराचे लोट  दूरवर दिसत आहे. या कंपनीतून स्फोटाचा आवाज देखील ऐकू येत आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.