देवाच्या चरणी तरी खरे बोला- सामनातून फडणवीसांवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तिथे ते म्हणाले, "राजकारण गेलं चुलीत, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. त्याला बट्टा लागला आहे. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती."
त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना सामनाने म्हटले, "महाराष्ट्राची इज्जत आणि गव्हर्नन्स चुलीत घालण्याचं काम ते स्वत:च करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?
"देवाच्या चरणी तरी खरं बोला. देशातील भाजपशासित राज्यात चांगल्या प्रशासनाचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पाहा म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल,"
भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरु असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची हीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे व त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही.