मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (10:34 IST)

नाशिक जिल्ह्यात शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू

Two brothers drowned in a farm pond नाशिक जिल्ह्यात शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू  Maharashtra Regional News In Webdunia Marathi
नाशिक जिल्ह्यातील तालुका निफाड लोणवाडी परिसरातील शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुणाल गायकवाड(4) आणि सौरभ गायकवाड (7) असे या मृत्युमुखी भावांची नावे आहेत. 
 कुणाल आणि सौरभ हे दोघे भाऊ बाहेर खेळण्यासाठी गेले असता फिरत फिरत ते शेततळ्याकडे गेले आणि कुणालचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला आणि पाण्यात बुडू लागला. कुणाल ला वाचविण्यासाठी सौरभने आरडाओरड केली पण दुर्देवाने त्याची हाक ऐकण्यासाठी तिथे कोणीच नहव्ते.

आपल्या भावाला वाचविण्यासाठी अखेर सौरभ पाण्यात गेला मात्र त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.