गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (12:20 IST)

लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यू

आपल्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना एका तरुणाचा हृदयविकाऱ्याच्या धक्क्याने मृत्यू ल्याची घटना बीड येथे रविवारी घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत(25) रा .माजलगाव असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

बीड जिल्ह्यात शिंदेवाडी येथे माने -कोळसे यांच्याकडे लग्नसोहळा सुरु होता.या लग्न सोहळ्यासाठी नवरदेवाचे मित्र-मंडळ  देखील आले होते.  
 
रविवारी सायंकाळी लग्नाच्या आधी देवाचे पाया पडण्या साठी नवरदेव अक्षय माने याची मिरवणूक सुरु झाली. या मध्ये वऱ्हाडी सह मित्र मंडळ देखील सहभागी झाले. वैभव राऊत देखील या मिरवणुकीत होता. 
 
डीजेच्या ठेक्यावर सर्व तरुण बेधुंद होऊन नाचत होती. नाचताना दमल्यावर वैभव लग्नस्थळी येऊन खुर्चीवर बसला आणि तहान लागली म्हणून पाणी प्यायला. तिथेच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वैभव खाली कोलमडून पडला. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तर त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.