गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (09:07 IST)

विधानपरिषदेत विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. सर्वश्री सदस्य योगेश सागर, संजय शिरसाट, सुनिल भुसारा,सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२-३ साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली.विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली.दरम्यान, विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

Edited By - Ratnadeep Ranshoor