1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (21:48 IST)

K Manjulakshmi के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

K Manjulakshmi
social media
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवारी (दि.२३) आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पद रिक्त होते. यावरुन कोल्हापुरात राजकीय वाद पेटला होता.अखेर आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाल्याने कोल्हापूरकरांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.