बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (13:12 IST)

खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु

जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या शिष्टमंडळाकडून अर्जुन खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
 
जालना जिल्ह्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हा वाद जुना आहे. त्यात खोतकरांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.