शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (17:28 IST)

राज्यात पावसाचं आगमन,अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

monsoon
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर कोकणातील काही भागात हलका ते मध्यम पावसाची सुरुवात झाली आहे. राज्यात ठाणे, मुंबई, पालघर अंधेरी, चर्चगेट, खार येथे पावसाने हजेरी लावली असून वातावरण गार झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे .
 
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
 
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानं गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल.