गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (18:38 IST)

Coronavirus Maharashtra Update : राज्यातील सहा जिल्ह्यात टेन्शन वाढवलं, कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर केले आहे. राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दररोज कोरोनाबाधितांची संख्या एक हजारापेक्षा अधिक मिळत आहे. राज्यातील सहा जिल्ह्याने चिंता वाढवली आहे. या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 
 
महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या 527 ने वाढून 4559 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, आणखी 517 लोक बरे झाल्यानंतर, त्यातून सुटका झालेल्यांची संख्या 7736792 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 1,47,861 वर पोहोचली आहे. 

केंद्र सरकारने या राज्यांला पत्र लिहून तपासाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने राज्याला कोविड प्रकरणांच्या क्लस्टरवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, श्वसन संक्रमण आणि इन्फ्लूएंझा संबंधित आजारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे तसेच कोरोना विषाणूच्या प्रकरणांचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जीनोम अनुक्रम वाढवण्यास सांगितले.केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये सखोल निरीक्षण, अधिक चाचणी, ट्रॅकिंग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे की, 'राज्याने कडक दक्षता बाळगणे आवश्यक आहे. संक्रमणाचा कोणताही उदयोन्मुख प्रसार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. .
 
राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे ,पालघर, रायगड या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारने राज्यसरकारला पत्र लिहून नवीन कोरोनाव्हेरियंट वर लक्ष देण्यास तसेच टेस्टिंग, लसीकरण वाढवण्यास भर देण्यास सांगितले आहे. 
 
राज्य सरकार ने नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच वयोवृद्ध नागरिक, मुलांची गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले आहे. मास्क वापरला नाही तर नियम लादले जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला राज्य सरकार ने दिला आहे. हंगामी रोगाचं प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आजाराला बळी पडण्यापूर्वी वेळीच निदान करणे आवश्यक आहे.