सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 3 जून 2022 (07:46 IST)

कोरोना रुग्णसंख्येत वाढ, राज्यात १०५४ नव्या बाधितांची नोंद

राज्यात काही दिवसांपासून कोरोना  रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १०५४ नव्या बाधितांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात ५१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट  ९८.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात एका मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यूदर  १.८७ टक्के झाला आहे. ८ कोटी ९ लाख ७७ हजार ९०८ नमुन्यांपैकी ७८ लाख ८९ हजार २१२ नमुने आतापर्यंत पॉझिटीव्ह  आले आहेत. तर, सध्या राज्यात ४ हजार ५५९ रुग्ण सक्रीय आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी राज्यात हजाराच्या वर रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली असून लसीकरणावर  भर देण्यात आला आहे.