शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (07:58 IST)

मुंबईतील कोरोना प्रादुर्भावाची अशी आहे परीस्थिती

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. मुंबईत दिवसाला हजार कोरोनाबाधितांची नोंद होत होती पंरतु आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे दिवसाला १०० ते १५० कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गुरुवारी मुंबईत एकूण ११९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच १ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आढळत असून अति जोखीम्या रुग्णांची नोंद घटली आहे. मुंबईत सध्या १०८८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. २५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
मुंबईत फेब्रुवारी महिन्यात पाचवेळा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद शून्य झाली आहे. मुंबईत बुधवारी शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती पंरतु गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्यासुद्धा एक आणि दोन अंकावर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. मुंबईत १ कोरोनाबाधिताच्या मृत्यूसह १६ हजार ६९१ रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
 
२३ फेब्रुवारी रोजी मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली असून या महिन्यात पाचव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. यापूर्वी मुंबईत १५,१६,१७ आणि २० फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. तिसरी लाट सुरू झाल्यानंतर २ जानेवारीनंतर १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती. या नंतर ‘डिसेंबर २०२१’ मध्ये देखील ७ वेळा ‘शून्य’ मृत्यूंची नोंद झाली होती.