गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (17:34 IST)

2 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळेल

Children between the ages of 2 and 6 will soon receive the corona vaccine2 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस मिळेल  Marathi Coronavirus News In Webdunia Marathi
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. कोरोनाची लाट ओसरत आहे. आता सर्व वयोगटाच्या लोकांना लसीकरण दिले जात आहे. आता 2 ते 6 वयोगटाच्या मुलांसाठी सरकारने पुढे पाऊल टाकत लस देण्यास सुरुवात केली आहे.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने विकसित केलेल्या कोवोव्हॅक्स लस ने देशातील विविध भागातील 10 रुग्णालयात प्राथमिक चाचणीत 2 ते 6 वयोगटातील 230 मुलांना चाचणी दरम्यान लसीकरण करण्यात आले आहे. 
 
कोरोनाच्याविरुद्ध लढाईत सरकारने हे अत्यंत उपयुक्त पाऊल उचलले आहे. सध्या चाचणी करून लस दिलेल्या मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 21 दिवसांनी या मुलांना दुसरा डोस देण्यात येईल. कोवोव्हॅक्स लसीची चाचणी मे पर्यंत केली जाणार. या नंतर कोवोव्हॅक्स लस 2 ते 6 वयोगटातील मुलांसाठी सुरु करण्यात येईल.