रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :वर्धा , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:47 IST)

आर्वी गर्भपात प्रकरण

kadam hospital
आर्वी (Arvi) येथील कदम रुग्णालयात झालेल्या अवैध गर्भपात (Wardha Abortion) प्रकरणात पोलिसांचा (Maharashtra Police) कसून तपास सुरु आहे. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र आरोग्य (Health) विभागाशी निगडित असलेल्या या प्रकरणात आरोग्य विभाग तपासाचा आव आणत केवळ कागदी घोडे नाचवताना दिसत आहे. तर आरोग्य विभाग तपासात पाहिजे तसे पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे.
 
आर्वि येथील गर्भपात प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच  आरोग्य विभागाला या अतिसंवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य अजूनही समजले नसल्याचे दिसून येत आहे.  पीसीपीएनडीटी कमिटीने 48 तासात चौकशी अहवाल न्यायालयात सादर करणे आवश्यक असतानाही तब्बल 11 दिवसांनी अहवाल सादर करण्यात आला. डॉ. रेखा कदम आणि  डॉ. नीरज कदम यांच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान तब्बल 70 सोनोग्राफी झाल्या मात्र, यातील अनेक  सोनोग्राफी  फॉर्मवर  पेशंटची आणि डॉक्टरांची स्वाक्षरी आढळून आलेली नाही. तसेच सोनोग्राफी कारण हीनमूद केलेले नसल्याचे आढळून आले. एक फॉममध्यही अनेक  त्रुट्या आढळून  आल्या. मात्र अजूनही आरोग्य विभागाकडून पाहिजे तशी कारवाई केल्या जात नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.  
 
या मशीनचा डाटा तपासण्याकरिता पोलिसांनी रेडिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलिसांनी आठ दिवसा अगोदर पत्र देऊनही जिल्हा शल्यचिकित्सकांनी रेडिओलॉजिस्ट अद्याप उपलब्ध करून दिला नाही. तर याप्रकरणातील डॉ. रेखा कदम यांनी पीडितेचा गर्भपात करीत असल्याबाबत आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे का याची माहिती विचारूनही अद्याप जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.