सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (08:37 IST)

अरविंद केजरीवाल घेणार शरद पवार आणि उध्दव ठाकरेंची भेट

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत केंद्राचा अध्यादेश चुकीचा असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. लवकरच केजरीवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 24 तारखेला ठाकरेंची तर 25 तारखेला पवारांची भेट घेणार आहेत. तर 23 तारखेला कोलकत्यात जाऊन केजरीवाल ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत.
 
राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्द्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा उभा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. केंद्र सरकारने या यानुषंगाने आणलेल्या अध्यादेशाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ असं केजरीवील यांनी म्हटलं आहे. संबंधित अध्यादेश हा राज्यघटना, लोकशाहीच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवला असूनही हे न्यायालयालाच आव्हान दिल्यासारखे असल्याचे त्यांनी नमूद केलेयं. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असून विरोधी पक्षांनी याबाबतचे विधेयक राज्यसभेच्या आडवळणाने मंजूर होऊ देता कामा नये. यासाठी आपण विरोधीपक्षांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलयं.
 
Edited By - Ratnadeep ranshoor