शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (21:21 IST)

फरार किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला; पोलिसांसमोर सरेंडर होणार

आर्यन खान अटक प्रकरणानंतर अनेक घडामोडींना वेग येताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या खळबळजनक आरोपानंतर फरार असलेल्या किरण गोसावी आता समोर आला आहे. किरण गोसावीने आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं प्रसार माध्यमांशी संपर्क साधून स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्याने खंडणी घेतल्याचे आरोप देखील फेटाळले आहेत.
 
मागील काही दिवसांपासून किरण गोसावी हा फरार होता. शेवटी त्याचा थांगपत्ता लागला. किरण गोसावीने सांगितले की, प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेटलो नाही.त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती. तर, मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई केली. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता. असं किरण गोसावी याने सांगितलं आहे.