1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (11:56 IST)

दोन खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता, पॅरोलवर बाहेर येताच आरोपी पत्नीचा खून करून फरार

Maharashtra News
महाराष्ट्रातील लातूर मधून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. जिथे पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने आणखीन एक हत्या करीत पळ काढला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने आपल्या पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आहे. व फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी पहिलेच दोन खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता. त्याला दोषी ठरवण्यात येऊन जन्मठेपेची शिक्षा तो भोगत होता. 
 
तसेच बाहेर आल्यानंतर तो त्याच्या पत्नीला त्रास देत होता. व तिला तिच्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये म्हणून सांगत होता. मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले व या आरोपीने पत्नीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. व तिथून पळ काढला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. 

Edited By- Dhanashri Naik