बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (14:56 IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : महायुतीत राजकीय चळवळ, एकनाथ शिंदे, अजित पवार दिल्ली जाणार !

eknath shinde ajit panwar
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये राजकीय पेच वाढला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांना भाजपसोबत जागावाटप लवकरात लवकर निश्चित करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी दिल्लीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलणी करणार.
 
या दोन्ही नेत्यांची दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते आपापल्या पक्षांच्या जागा आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा करतील. भाजपला 140-150 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे मानले जात आहे.
 
राष्ट्रवादीचे अजित पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊ शकतात, 
वृत्तानुसार, भाजप 140-150 जागांवर निवडणूक लढवू शकते. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 तर राष्ट्रवादी 40-55 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 
Edited By - Priya Dixit