शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (15:57 IST)

आरक्षण विधेयक मंजूर होताच भुजबळ आक्रमक

chhagan bhujbal
राज्य सरकारने आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या अधिवेशनात आरक्षणाचा प्रस्ताव मांडला. म्हणून आता मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे नोकरीत तसेच शिक्षणात १० टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळाले आहे. पण सभागृहात हे विधयेक मंजूर होत असतांना ओबीसीचे नेते छगन भुजबळ हे आक्रमक झाले. 
 
छगन भुजबळ म्हणाले,की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण मला जरांगे धमक्या देतात. त्यांनी आईवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शिव्या दिल्या.तसेच त्यांची काय दादागिरी चालली आहे, त्याला अटकाव करणार आहे की नाही. तसेच एसपी, अधिकाऱ्यांना अपशब्द म्हणतात. ही दादागिरी बंद झाली पाहिजे.हे आरक्षण आम्हाला मान्य नाही,असे छगन भुजबळ म्हणाले. 
 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर छगन भुजबळ यांना बोलण्यासाठी अधिक वेळ देण्यास नकार दिल्याने भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सरकारनं उचित उपाययोजना करावी, असेही विधानसभा अध्यक्ष यावेळी म्हणाले. तुमच्या चिंतेंबाबत मी नोंद घेतली आहे.  
 
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी मात्र पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा,मागणी केली होती. जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.कारण विधानसभेत 'सगेसोयरे'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही उल्लेख केला नसल्याने आक्रमक झालेत.

Edited By- Dhanashri Naik