मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (08:42 IST)

आशिष शेलारांच्या मेंदूला लकवा मारलाय, मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर

”ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला होता.या सवालावर आता मला वाटतंय यांच्या मेदूला लकवा आलाय की काय”, असं प्रत्युत्तर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी आशिष शेलार यांना दिलं आहे.
 
“आशिष शेलार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई लागली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही स्वप्न पडत आहेत. ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत, लकवा वगैरे शब्द वापरतायत. मला वाटतंय यांच्या मेदूला लकवा आलाय की काय”, असं मनीषा कायंदे यांनी शेलारांना टोला लगावलाय.
 
शिवसैनिक खपवून घेणार नाहीत
“आशिष शेलारांना  मी इशारा देते. मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही बोललं जातंय, ते शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना जनतेच्या तब्येतीची काळजी आहे. जे निर्देश केंद्र सरकारकडून कोरोनाबाबतचे निर्देश येतात, त्याचं पालन आम्ही तंतोतंत करत आहोत. जे टास्क फोर्स सांगतो, ते करायला हवं. तुम्ही काही डॉक्टर नाही आहात, वैज्ञानिकही नाही आहात. त्यामुळे उगीच काहीतरी बोलून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा तुमचा प्रयत्न बंद करा”, असं मनीषा कायंदे  म्हणाल्या आहेत.