रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 30 मार्च 2022 (09:05 IST)

अंशुलची ७ व्या वर्षीच सुवर्ण भरारी, दक्षिण आफ्रिकेतील ४५०० मीटर उंच किलिमांजेरो हे सर्वात उंच शिखर सर

अंशुल आणि वैद्यनाथ पिता, पुत्राचे सर्वत्र अभिनंदन. स्वतःवर विश्वास असल्यास कोणतेही कठीण धेय्य साध्य करता येते हे पुन्हा दिसून आले. - हेमंत पांडे, चेअरमन, नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन.
 
  मागील आठवड्यात नाशिकचा ७ वर्षाच्या अंशुल वैद्यनाथ काळे या खेळाडूने दक्षिण आफ्रीकेच्या सर्वात उंच  किलिमांजेरो शिखरावर भारताचा झेंडा रोवण्यात यश मिळविले.

नाशिकचे खेळाडूं विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा, एशियाड, जागतिक स्पर्धा आणि थेट ऑलीम्पिक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करून क्रीडा क्षेत्रासाठी फारच मोलाचे योगदान देत आहेत.

या कामगारीमध्ये अवघ्या ७ वर्षे आणि ११ महिने वय असलेल्या नाशिकच्या अंशुल वैद्यनाथ काळे या उदयोन्मुख खेळाडूंने दक्षिण आफ्रीकेच्या द माऊंट किलिमांजेरो या साडेचार हजार मीटरपेक्षा  उंच असलेल्या  सर्वात उंच शिखरावर भारताचा झेंडा रोवण्यात यश मिळविले आणि आपण उद्याचे स्टार आहोत याची प्रचीती दिली.
 
नाशिकचे अँथलेटिकस प्रशिक्षक  वैद्यनाथ काळे हे गेल्या १५-१७ वर्षांपासून नाशिकच्या खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या व्ही. डी. के. स्पोर्ट्स फौंडेशन ( vdk sports foundation) या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले अनेक खेळाडूं राज्य आणि राष्ट्रीय स्थरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
 
नाशिकच्या खेळाडूंनी थेट ऑलीम्पिकमध्ये मेडल मिळवावे हा उद्देश असल्यामुळे त्यांनी केवळ ७ वर्षाच्या आपल्या मुलाच्या माध्यमातून  हा फार मोठा पल्ला पार केला आहे. कारण द माऊंट किलिमांजेरो या साडे चार हजार मीटर पेक्षा  उंच असलेल्या  या उंच शिखरावर चढतांना अनेक बाबींना तोंड द्यावे लागते. कारण आपण जसजसे वर जातो तेथे ऑक्सिजन कमी कमी होत जातो. बऱ्याच वेळा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावे लागते.

आणि आपली शारीरिक क्षमता जर चांगली असेल तर आणि तरच वर जाता येते. अन्यथा आपला जीव गुदमरू शकतो. अश्या कठीण परिस्थितीत अंशुलने काही अंतर पार केल्यानंतर दोन टप्पे राहिले असतांना तेथील स्थानिक गाईडनी अंशुलला आणखी वर जाणे शक्य होणार नाही असे सांगितले होते.

अंशुलला त्या दरम्यान थोडासा त्रासही झाला होता. त्यामुळे त्याचे वडील वैद्यनाथ यांनीही परिस्थिती बघून या गाईडच्या सुचनांना संमती दिली. परंतु अवघ्या ७ वर्षाच्या अंशुलने मनाशी खुणगाठ बांधून मला हे शिखर सर करायचेच आहे असे अगदी ठासून सांगितले. आणि ऑक्सिजन सिलेंडर न घेता अगदी जिद्दीने हा  शेवटचा टप्पा पार करून इतिहास घडवला.

अंशुलच्या या देदीप्यमान कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्याचे सर्व सहकारी, प्रशिक्षक व्ही.डी.के. स्पोर्ट्स फौंडेशन आणि नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशन यांच्या वतीने त्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हॊते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम.व्ही.पी. संस्थेच्या आर्कीटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब शिंदे, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य गौरव सिंग, या प्रभागाच्या नगरसेवीका  हिमगौरी आडके - आहेर, नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन  हेमंत पांडे, आंतरराष्ट्रीय पदक विजेती खेळाडू सुप्रिया अदक आदी मान्यवरांच्या हस्ते अंशुल आणि वैद्यनाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले.

तसेच पॅरा ऑलीम्पिक स्पर्धेत सहभागी झालेला दिलीप गावित आणि जागतिक स्कुल गेम्स साठी निवड  झालेली  श्रावणी सांगळे यांनाही सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी बोलतांना प्राचार्य शिंदे यांनी सांगितले की वैद्यनाथ काळेसारख्या प्रशिक्षकांनी  अश्या प्रकारे काम केले  तर पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये  नाशिकचे २०-२५ पदक विजेते खेळाडू असतील आणि ऑलीम्पिकमध्ये मेडल मिळवून देणारा खेळाडूही नाशिकचाच असेल असे सांगितले.

हेमंत पांडे यांनी सांगितले की जर खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्याकडे आत्मविश्वास (self confeedance ) असेल तर कोणतीही धेय्य साध्य करता येते हे अंशुलने दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामध्ये व्ही.डी.के. स्पोर्ट्स फौंडेशनच्या सर्वांचे श्रेय आहे असे सांगितले. यावेळी वैद्यनाथ काळे यांनी आपल्या या उपक्रमामध्ये आलेल्या अनुभवांची माहिती दिली. यावेळी अंशुलने सर केलेल्या या शिखराची क्लिप दाखविण्यात आली.
 
या कार्यक्रमासाठी व्ही.डी.के. स्पोर्ट्सचे २३० खेळाडू त्यांचे पालक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.