शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (14:40 IST)

राज्य सरकार कडून पूरग्रस्तांसाठी मदत

सध्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशःझोडपून काढले आहे.पावसाचे थैमान सर्वत्र हाहाकार माजला  आहे.अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या बातम्या आहे तर कुठे पुरामुळे गंभीर स्थिती बनली आहे. लोकांनी या मध्ये आपले कुटुंबियांना गमावले आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अशा परिस्थितीत लोकांना पूरग्रस्त भागात लोकांना वीज नाही,संपर्क यंत्रणा नाही,खाण्यासाठी काहीच नाही.अशा गंभीर परिस्थितीशी झुंज देणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार काही उपाय योजना करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पूरग्रस्त भागात लोकांना डाळ,तांदूळ,आणि पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या जातील तसेच रॉकेल देखील पुरवले जाणार. सध्या काही ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे गिरण्या बंद आहे.त्यामुळे त्या भागात धान्य म्हणून डाळ तांदूळ आणि रॉकेल दिले जाणार.
 
या शिवाय केंद्र सरकार कडून देखील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जाणार आहे.तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाईल.अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.