बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (08:35 IST)

काय म्हणता, इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिरात पुराचे पाणी

इतिहासात पहिल्यांदाच ज्योर्तिंलिंग भिमाशंकर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेडा पडला आहे. गेल्या 24 तासांपासून भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस होत आहे. मंदिराच्या बाजुच्या डोंगरातुन पुराचा लोट आल्याने मंदिरात पाणी जमा झाले आहे.
 
मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक मंदिराच्या दिशेने आल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात ही पाणी शिरले आहे. सह्याद्रीच्या कुशीत गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असल्याने आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातुन आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.