शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (11:40 IST)

काय सांगता! 8 पायांचे शेळीचे पिल्लू जन्मले

एका शेळींने  8 पाय,2 कुल्हे असणाऱ्या एका पिल्लाला जन्म देण्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचा जन्म पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथे झाला आहे.त्या गावातील सरस्वती मोंडल नावाच्या महिलेच्या शेळीने आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिला आहे.ही माहिती गावात वेगाने पसरली असताना त्या पिल्ल्याला बघण्यासाठी मोंडल यांच्या घरी गर्दी झाली.सध्या या शेळीच्या पिल्लूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सरस्वती यांच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यात एक पिल्लू सामान्य असून दुसऱ्या पिल्लूला आठ पाय आणि दोन कुल्हे आहेत.या पिल्लूला बघतातच सरस्वती घाबरल्या.त्यांनी असं हे प्रथमच बघितल्याचे सांगितले.दुर्देवाने या आठ पायाच्या पिल्लूचा जन्माच्या अवघ्या पाच मिनिटातच मृत्यू झाल्याचे सरस्वती यांनी सांगितले.दुसरे पिल्लू सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.या आठ पायाच्या पिल्लाला बघण्यासाठी त्यांच्या घरी गावकरांनी गर्दी केली होती.आणि त्याचे फोटो काढले.ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.