शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (08:18 IST)

डॉ. भारती पवार यांची पोस्ट आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल

दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची पोस्ट आणि व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.यापूर्वी खासदार म्हणून त्या संसद भवनात प्रवेश करीत असत.मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि देशातील आरोग्य व्यवस्था यासंदर्भात विरोधकांकडून मोदी सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.आणि हाच किल्ला आता आरोग्य राज्यमंत्री या नात्याने डॉ. पवार यांना लढवायचा आहे. त्यामुळेच नव्या पर्वाला सुरूवात करण्यापूर्वी डॉ. पवार या संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्या होत्या. हाच फोटो आणि पोस्ट सध्या सोशल मिडियात कौतुक आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
 
पोस्ट अशी ....
 
“भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नतमस्तक होत कायम स्वरुपी जनतेच्या सेवेत समर्पित”