मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (23:28 IST)

शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना अटक, अश्लील चित्रपट बनविणे आणि अॅप्सवर दाखविल्याचा आरोप

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि काही अॅप्सवर दाखवल्याचा आरोप आहे.
 
आयुक्तांनी सांगितले की तपासणी दरम्यान असे आढळले की राज कुंद्रा हा या रॅकेटमधील मुख्य किंगपीन आहे. पोलिसांना त्याच्याविरुद्ध पुष्कळ ठोस पुरावे मिळाले. त्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांचे वक्तव्य सर्वप्रथम महाराष्ट्र सायबर सेलने सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणात घेतले होते. या प्रकरणात यावर्षी 26 मार्च रोजी सेलने एकता कपूर यांचे निवेदनही घेतले होते.
 
यापूर्वी शेरलिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला असे निवेदन दिले होते की राज कुंद्रा यांनीच त्यांना Adult Industryत आणले. शर्लिन चोप्रा यांनी प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये दिले आहेत. शर्लिन यांनी राज कुंद्राबरोबर असे सुमारे 15 ते 20 प्रकल्प केले आहेत.