गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (14:38 IST)

तरुणीवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न;तरुणाला अटक

Attempt to destroy evidence by raping a young woman; Young man arrested Maharashtra News Pune News In Marathi webdunia Marathi
लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर एका तरुणाने वारंवार तिच्या मर्जीविरोधात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिला.यामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यानंतर तरुणाने त्या दोघांमधील फोटो,मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. तरुणीने लिहिलेली डायरी लपवली.याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

अविनाश अनंत भांगे (वय 27, रा. खातेवस्ती,काळेवाडी,पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि.14) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हा प्रकार जून 2019 ते 13 जुलै 2021 या कालावधीत मळवली स्टेशन लोणावळा येथे एका लॉजवर,पीडित तरुणीच्या घरी आणि हिंजवडी मधील हॉटेल ट्विन्स टॉवर लॉजिंग येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अविनाश याने पीडित तरुणीला लग्नाचे अमिश दाखवले. त्यानंतर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.तरुणीला शिवीगाळ,दमदाटी करून हाताने मारहाण केली.एवढे करून त्याला लग्नाबाबत विचारले असता अविनाश याने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.
 
यामुळे तरुणीने विषारी औषध प्राशन केले. ती हॉस्पिटलमध्ये असताना अविनाश याने तिने लिहून ठेवलेली डायरी, मोबाईल मधील सर्व फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले.अजित अनंत भांगे या व्यक्तीच्या फोनवरून पीडित तरुणीला फोन करून ‘तू अविनाशला मेसेज का केलेस. तू त्याचे दोन वर्षे आयुष्य बरबाद केले आहे.तू त्याच्याशी लग्न करून त्याला बरबाद करणार आहेस का’ असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.